अमानुष ः कृष्णावंतीच्या डोहात होत्या दोन गोण्या...त्या होते तरूणाचे नऊ तुकडे

The body of a young man was found in Akola
The body of a young man was found in Akola

अकोले : तालुक्यातील वाकी शिवारात अमानुषपणा ग्रामस्थांना पाहायला मिळाला. एका तरूणाचा खून करून त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे करून पोत्यात भरून कृष्णवंतीच्या डोहात फेकले आहेत.

हा मृतदेह नग्नावस्थेत होता. मृतदेहाचे 9 तुकडे करण्यात आले आहेत. हात, पाय, मान, मुंडके एका पांढऱ्या धोतरात बांधलेले होते. तर चार अवशेष दोन पांढऱ्या प्लास्टिक गोण्यांमधून पुलावरून टाकण्यात आले होते. 

त्या पुलाच्या कठड्याला रक्तही मिळून आल्याने हा मृतदेह रात्रीच्या अंधारात टाकला असावा, असा पोलिसांचा कयास आहे . हा मृतदेह तीन दिवसापूर्वीच झाला असावा. शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी दुर्गंधी कसली येते म्हणून चौकशी केली तर त्याला कावळे टोच्या मारीत होते. ग्रामस्थांना आणखीनच संशय आला. त्यांनी तातडीने गुरुवारी सकाळी पोलीस पाटील सोमनाथ सगभोर यांच्या कानावर ही घटना घातली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीय

त्यांना पांढऱ्या प्लास्टिक गोणीत गच्च बांधलेले दिसले. त्यांनी राजूर पोलिसांना ही माहिती कळवली. त्यानंतर सपोनि नितीन पाटील सहायक नितीन खैरनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्यातील प्रेताची दोन पोते स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढली.  

मृत शरीर व त्याचे केलेले तुकडे पाहून खाकी वर्दीही हबकली. सपोनि नितीन पाटील यांचे ओठ काही क्षण पुटपुटले काय नीच कृत्य आहे. हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असल्याचे पाहून पंचदेखील हबकले. ते राजूर ग्रामीण रुग्णालयात आणले.

या घटनेने वाकी, भंडारदरा परिसर भयभीत झाला अाहे. हा मृत तरुण स्थानिक की बाहेरील याचा शोध पोलीस घेत आहेत आज अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय ढोमणे, नितीन खैरनार, प्रकाश निमसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या खुनाच्या बाबत बारीक सारीक गोष्टीची माहिती घेत तपास सुरु आहे .मात्र, खिरविरे येथील एक तरुण गायब असल्याचे समजते. त्याच्या भावाने अकोले पोलिसांकडे मिसिंगची केस दिली अाहे. या मृतदेहाचा हाताला असलेला काळा  दोरा आपल्या भावाचा असल्याचे संबंधितांचे मत अाहे.

या बाबत सपोनि नितीन पाटील अजून काही धागेदोरे लागतात का याची तपासणी करीत आहे. ठिकठिकाणी तीन पथके पाठविण्यात आली अाहेत. खिरविरे परिसरातही पोलिसांची एक टीम पोहचली अाहे. तपासाचा वेग तीव्र गतीने पुढे सरकत आहे.

अकोले तालुक्यातील वाकी , भंडारदरा , साम्रद या ठिकाणी यापूर्वीही काही अज्ञात मृतदेह जळलेल्या अवस्थेत किंवा पाण्यात बुडून सापडले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com