esakal | नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत देणी
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal employees will get overdue dues, agitation postponed

प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगारांनी कालपासून (ता. 11) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. महापालिका प्रशासनासोबत काल दोन वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या.

नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत देणी

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले होते. महापालिका आयुक्‍तांबरोबर आज सकाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील फरक, सानुग्रह अनुदान आदी लाभ मिळणार आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घेतल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी जाहीर केले. 

हेही वाचा - केळी लावण्यासाठी पठ्ठ्याने विकली शेतीच आता..

प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगारांनी कालपासून (ता. 11) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. महापालिका प्रशासनासोबत काल दोन वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या. त्यानंतर आज सकाळी पुन्हा महापालिका प्रशासन व संघटनेत सकारात्मक चर्चा झाली. महापालिका कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीचे दीड कोटी रुपयांचे तीन हप्ते देणे, महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदानाचे थकीत प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यासाठी 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेंतर्गत महापालिका कामगारांची 28 लाख रुपयांची सर्व थकीत बिले अदा करण्यात येणार आहेत. सहाव्या वेतन आयोगापोटी मृत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा 49 लाखांचा पगार फरक देणे, आश्वासित प्रगती योजनेंतर्गत 25 लाखांची बिले अदा करणे, फॅमिली भत्त्यापोटीचा 25 लाखांचा फरक संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये महागाई भत्त्याचा फरक अदा करणे, तसेच शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन व वेतनकामी 25 लाख रुपये देणे, आदी निर्णय बैठकीत झाले. 
कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमधील 79 लाख रुपये वर्ग करण्यात आले. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. बैठकीला महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, कामगार अधिकारी दिगंबर कोंडा, संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अयूब शेख, अकिल सय्यद, महादेव कोतकर, गुलाब गाडे, पाशा इमाम शेख, सतीश ताठे आदी उपस्थित होते. 

loading image