esakal | Crime News | कोंबड्या चोरल्याप्रकरणी एकाचा खून; नदीपात्रात सापडला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह

कोंबड्या चोरल्याप्रकरणी एकाचा खून; नदीपात्रात आढळला मृतदेह

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अकोले (जि. अहमदनगर) : कोंबड्याचोरी प्रकरणी तालुक्यात एकाचा खून झाला आहे. या प्रकाराची तक्रार सरपंचांकडे केली होती. त्याचा राग धरून गर्दनी येथील दशरथ नारायण मडके यांचा खून झाला. याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांना पोलिसांनी अटक केली.

याबाबत अनसूया मडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दशरथ नारायण मडके (रा. गर्दनी) यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय होता. देवजी खोडके याने या पोल्ट्रीतून कोंबड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकराची मडके यांनी सरपंचांकडे तक्रार केली होती. त्याचा खोडके याला राग आला. दोन ऑक्टोबर रोजी मडके, देवजी खोडके व कावजी मेंगाळ हे तिघे बाजरीचे दाणे काढण्याचे काम करून अकोल्यात आले. अकोले येथील छोट्या अगस्ती पुलावर दारू प्यायला बसले. मडके यांना दारूच्या नशेत अकोले येथील छोट्या पुलावरून वाहत्या पाण्यात ढकलले.
दशरथ मडके घरी आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीने खोडकेकडे चौकशी केली. नंतर अनसूया मडके यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत पती हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मृत दशरथ पाण्यात पडून वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रात शोध घेण्यात आला. दशरथ यांचा मृतदेह शेकईवाडी प्रवरा नदीपात्रात आढळून आला. पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक हांडोरे तपास करीत आहेत

हेही वाचा: बदल्यांच्या गैरव्यवहारात जिल्ह्यातील नेता; विखे पाटलांचा गौप्यस्फोट

loading image
go to top