अण्णांच्या आंदोलनांचे राळेगणसिद्धीत होणार संग्रहालयरूपी जतन

अण्णा हजारे
अण्णा हजारेSakal

पारनेर (जि.नगर) : झोळी पसरून जनतेकडून जमा झालेल्या निधीवर व केवळ जनआधारावर उभ्या राहिलेल्या, तसेच देशभरातच नव्हे, तर जगात गाजलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna hazare) यांच्या आंदोलनांचा समग्र इतिहास सचित्र माहिती रूपात राळेगणसिद्धी येथे साकारत आहे. त्यांनी केलेल्या ३० वर्षांच्या विविध जनआंदोलनांच्या ऐतिहासिक माहितीचे संग्रहालय आकार घेत आहे. देशात वेगवेगळी संग्रहालये असली, तरी जनआंदोलनाचे संग्रहालय प्रथमच साकारत आहे. लवकरच ते सर्वांसाठी खुले होत आहे.

राळेगणसिद्धीला आदर्श गाव म्हणून उभे केल्यानंतर देशाला ग्रामविकासाची दिशा देण्याचे काम हजारे यांनी केले. मात्र राज्याचा व देशाचा विकास होत असताना विकासकामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती, हा विकासातील मोठा अडथळा आहे हे लक्षात आल्यानंतर हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात १९९०पासून जनआंदोलनांना राळेगणसिद्धी या छोट्या खेड्यातून सुरवात केली. जनहिताचे व भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे हाती घेऊन सलग ३० वर्षे राज्यात हजारे यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने झाली. त्यातूनच प्रथम राज्यातील व नंतर देशातील जनतेला माहितीचा अधिकार कायदा मिळाला. त्यानंतर मात्र हजारे यांची आंदोलने थेट देशपातळीवर पोचली.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर २०११मध्ये लोकपाल कायद्यासाठी ऐतिहासिक आंदोलन झाले. ते जगभर गाजले. या आंदोलनामुळेच देशभर भ्रष्टाराविरोधात अभूतपूर्व जनजागृती झाली. त्यानंतरही पुढे पाच वर्षे हे आंदोलन सुरू होते. त्यातूनच देशातील जनतेला लोकपाल कायदा मिळाला.

अण्णा हजारे
Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

हजारे यांनी केवळ आंदोलनेच केली नाहीत, तर त्याबरोबरीने लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी राज्यात आणि देशात सातत्याने दौरे करून जाहीर सभा घेतल्या. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता केवळ प्रत्येक सभेच्या ठिकाणी जनतेसमोर झोळी फिरवून लोकांच्याच आर्थिक मदतीने हे अभियान सुरू ठेवले. स्वतः घरदार सोडून मंदिरात राहणारा एक फकीर माणूस जनहितासाठी आपले प्राण पणाला लावतो, हे पाहून जनतेत चैतन्य निर्माण झाले. या जनआंदोलनांचा इतिहास भावी पिढीला कळावा, या उद्देशाने भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास व स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून एक भव्य संग्रहालय आकारास येत असल्याची माहिती अशोक सब्बन व ठकाराम राऊत यांनी दिली.

यापूर्वी ग्रामविकासाचे सचित्र संग्रहालय उभारलेले आहे. त्यास लाखो लोकांनी भेटी दिल्या आहेत. आता त्यात जनआंदोलन संग्रहालयाची भर पडणार आहे. त्यामुळे सामाजिक पर्यटनस्थळ म्हणून लौकिक असलेल्या राळेगणसिद्धीच्या वैभवात भर पडणार आहे. संग्रहालयास मूर्त स्वरूप देण्याचे काम संजय पठाडे यांनी, तर त्यांना कार्यालयीन मोलाचे सहकार्य स्वयंसेवक अन्सार शेख यांनी केले.

अण्णा हजारे
'भूसंपादनात कोणावरही अन्याय होणार नाही' - आमदार रोहित पवार

विविध आंदोलनांची तपशिलासह सचित्र माहिती या संग्रहालयात पाहावयास मिळणार आहे. तसेच, गेल्या ३० वर्षांत आंदोलनाच्या माध्यमातून जनहिताच्या प्रश्नांवर हजारे यांनी केलेला संपूर्ण पत्रव्यवहार येथे पाहता येणार आहे. डिजिटल प्रोजेक्टर व व्हिडिओच्या माध्यमातूनही आंदोलनाविषयी माहिती देण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे, खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. मात्र, त्यासाठी विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड काढण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आम्ही अनेक वर्षे आंदोलने केली. या आंदोलनांचा इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

संग्रहालयात असणार

महत्त्वाच्या पत्रव्यवहाराच्या फायली- ८५

बातम्यांच्या कात्रणांच्या फायली- २५०

आंदोलनांचे फोटो - ३००

अण्णा हजारे
HSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com