esakal | Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? तर काळजी नको, असे करा डाऊनलोड
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar, Pan, Voter id, Driving License

Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

तुमच्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card), व्होटर आयडी (Voter id), पॅन कार्ड (PAN Card) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) या सारखी महत्वाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगणे धोक्याचे ठरु शकते पण यांची गरज कोणत्याही ठिकाणी पडू शकते. मात्र घराबागेर जर का तुमची कागदपत्रांची बॅग किंवा पर्स हरवल्यास तुम्हाला हे सगळी मगत्वाचे कागदपत्र पुन्हा काढत बसावे लागू शकतात. हे टाळण्यासाठी तुम्ही ही सगळी महत्वाची कागदपत्रे आता व्हर्च्युअली देखील सोबत ठेवू शकता.असे केल्याने तुम्हाला ही अत्यंत महत्वाची कागदपत्रे हरवण्याचा धोकाही राहणार नाही आणि सर्व कागदपत्रे सगळीकडे घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. तुमची सगळी कागदपत्रे मोबाईलमध्ये राहतील आणि गरज पडेल तेव्हा तुम्ही ते प्रिंट देखील करुन घेऊ शकता. यासाठीच आज आपण सगळ्या कगदपत्रांचे E- व्हर्जन कसे डाऊनलोड करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

आधार क्रमांक वापरुन करा आधार कार्ड डाउनलोड

 • सगळ्यात आधी आधारच्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.

 • My Aadhaar पर्यायावर क्लिक करुन आधार डाउनलोड वर क्लिक करा किंवा https://eaadhaar.uidai.gov.in/ ही लिंक उघडा.

 • I Have सेक्शनमधून आधार नंबर हा पर्याय निवडा

 • आता 12 अंकी आधार क्रमांक डायल करा. जर तुम्हाला मास्क केलेले आधार डाऊनलोड करायचे असेल तर I Want Mask Aadhar पर्याया वर क्लिक करा.

 • कॅप्चा व्हेरिफीकेशन कोड टाका आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड मिळवण्यासाठी सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा

 • तुमच्या मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी टाका.

 • ही प्रोसेस पूर्ण करा आणि तुमच्या आधारची इलेक्ट्रॉनिक प्रत डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी, व्हेरिफाय आणि डाऊनलोड वर क्लिक करा

हेही वाचा: काश्मीरची 'ही' 4 ठिकाणे पाहिलीत का? ज्याची सुंदरता स्वर्गापेक्षा कमी नाही

इन्स्टंट ई-पॅन

पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पैन कार्ड धारक आयकर विभागाच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करून इन्स्टंट ई-पॅन किंवा त्यांच्या पॅन कार्डची डिजिटल व्हर्जन डाउनलोड करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया सोपी आहे आणि त्यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक आवश्यक आहे आणि त्यासाठी अवघे 10 मिनिटे लागतात.

 • आयकर ई-फायलिंगच्या https://www.incometax.gov.in. या अधिकृत वेबसाइट वर जा.

 • 'आमच्या सेवा' विभागात, 'इन्स्टंट ई-पॅन' पर्यायावर क्लिक करा.

 • जर तुम्ही आधी ई-पॅन डाऊनलोड केले असेल तर 'चेक स्टेटस/ डाऊनलोड ई-पॅन' पर्यायावर क्लिक करा, परंतु जर तुम्ही यापूर्वी कधीही ई-पॅन डाउनलोड केले नसेल तर तुम्हाला 'नवीन ई-पॅन' पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 • तुम्हाला तुमच्या गरजेनुसार दिलेल्या पर्यायांमधून ठराविक प्रयाय निवडावे लागतील आणि नंतर सुरू ठेवा वर क्लिक करावे लागेल.

 • आता जे पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. त्यामुळे इनपुट फील्डमध्ये तुमचा आधार क्रमांक टाका.

 • तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकताच पेजवर एक डिक्लेरेशन डिस्प्ले दिसेल, तुम्हाला सुरू ठेवा वर क्लिक करावे लागेल.

 • यानंतर तुमच्या नोंदणीकृत किंवा आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.

 • यानंतर, दिलेल्या फील्डमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी एंटर करा.

 • तुमचे सर्व तपशील या पेजवर दिसतील. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासल्यानंतर तुमचा ईमेल टाका.

 • लवकरच तुम्हाला तुमचा ई-पॅन तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तुमचे ई-पॅन प्रिंट देखील करू शकता.

 • जर तुमचा पॅन नंबर असेल तर तुम्ही तुमचे मूळ पॅन कार्ड कोठे तयार केले होते यावर अवलंबून UTIITSL किंवा TIN-NSDL च्या वेबसाईटवरून तुमचा ई-पॅन डाउनलोड करू शकता.

हेही वाचा: स्मार्टफोन पावसात भिजलाय? लगेच करा उपाय

मतदार ओळखपत्र

जर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही मतदार नोंदणीकृत असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेच्या मदतीने मतदार ओळखपत्र ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.

 • अधिकृत निवडणूक वेबसाइट वर जा

 • 'नवीन मतदार ओळखपत्र नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज' साठी फॉर्म 6 वर क्लिक करा जे तुम्हाला नवीन मतदार म्हणून अर्ज करण्याचा पर्याय देईल.

 • नवीन वापरकर्ता म्हणून पुढे गेल्यानंतर, तुम्हाला तुमचे नाव, वय आणि लिंग यांसारखी मूलभूत माहिती विचारण्यात येईल

 • तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता आणि वैवाहिक स्थितीची माहिती या ठिकाणी विचारली जाईल.

 • तुम्हाला दोन लोकांचा डिटेल्स सादर करण्यास सांगितले जाईल जे तुमची माहिती व्हेरिफाय करतील. तुम्हाला त्यांचे खासगी माहिती आणि मतदार ओळखपत्र देण्यास सांगितले जाईल.

 • एकदा तुम्ही सर्व पायऱ्या पूर्ण केल्यावर, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा आणि पत्ता बरोबर असल्याचा पुरावा अशी सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल.

 • यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर आणि ईमेल आयडीवर n अर्ज क्रमांक मिळेल.

 • मतदार ओळखपत्र तपासण्यासाठी तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक वापरू शकता.

 • एकदा ते वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचे नवीन मतदार कार्ड मिळवण्यासाठी 'डाउनलोड' बटणावर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा: बजाज Pulsar 250F लवकरच होणार लॉंच, काय असेल किंमत? वाचा

ड्रायव्हिंग लायसन्स

आता गाडी चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बाळगण्याची गरज नाही आता तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि कुठेही फिरू शकता. आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स पुढे दिल्याप्रमाणे अगदी सहज डाउनलोड करू शकता

 • सर्वप्रथम ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करण्यासाठी https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

 • आपले राज्य निवडा

 • राज्याची निवड केल्यानंतर, आपल्या राज्य सारथी परिवहन वेबसाइटच्या व्यू पेजवर क्लिक करा.

 • त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मेनू निवडा

 • ड्रायव्हिंग लायसन्स मेनूमध्ये प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स निवडा

 • प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोज दिसतात

 • ड्रायव्हिंग लायसन्स पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख विचारण्यात येईल, ती टाका.

 • त्यानंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स PDF स्वरूपात डाउनलोड होईल

loading image
go to top