

-अरुण नवथर
अहिल्यानगर : जिल्ह्यातील गुंतवणूकदार अधिक परताव्याच्या ‘मोहा’त पडून आपले तोंड पोळून घेत आहेत. पैसा कमविण्याचे ‘ध्येय’ बाळगणाऱ्यांच्या जाळ्यात सापडून त्यांची ससेहोलपट होत आहे. कष्टाने कमावलेली ‘महालक्ष्मी’ गुंतवणूकदार कोणतीही विचारपूस न करता इतरांच्या हाती सोपवित आहेत. त्यातूनच गेल्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांवरून जिल्ह्यातील आर्थिक साक्षरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे तपासातील अपयशही लपून राहिलेले नाही.