नगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणेंना अटकपूर्व जामीन

जिल्हा शासकीय रुग्णालयास ता. 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागास आग लागून आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
court
courtSakal

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी मंजूर केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयास ता. 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागास आग लागून आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा आणि डॉ. ढाकणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

डॉ. पोखरणा यांच्या वतीने कोरोनाच्या लाटेच्या वेळेस जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने या कक्षाची उभारणी केल्याचे सांगितले. शासकीय बांधकामांना काम पूर्णत्वाचा दाखल घेणे हे बंधनकारक नसल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कक्षाचे बांधकाम झालेले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्रत्यक्ष या बांधकामाशी संबंध नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही हे मुद्दे मांडण्यात आले. आग प्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची नाही, असे म्हणणे सादर करण्यात आले होते.

court
नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

डॉ. सुरेश ढाकणे यांच्या वतीने दुर्घटनेच्या वेळेस आपण गावी असल्याने प्रत्यक्ष आगीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोघांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची सोलन्सी, न्यायालयाच्या परवानगी शिवाय जिल्हा सोडून न जाणे, तपासी अधिकारी बोलवतील, त्यावेळेस हजर राहणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, पुराव्याशी छेडछाड न करणे आदी अटी लादल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com