Electric shock:'विजेचा धक्का बसून वृद्धाचा मृत्यू'; नगर तालुक्यातील घटना, कुंपणात विद्युत प्रवाह सोडला अन्..

Nagar Taluka Accident: मृत लांडगे हे ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या शेतात चाललेले होते. त्यांच्या शेताशेजारीच संतोष लांडगे यांचे शेत असून, त्यांनी शेतास तारेचे कुंपण घातलेले आहे. या कुंपणात त्यांनी वीज प्रवाह सोडला होता. बारकू लांडगे यांना या तारेतून विजेचा धक्का बसला.
Electric Shock
Electric Shocksakal
Updated on

नगर तालुका: नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील एका शेतकऱ्याने शेताभोवतालच्या तारेच्या कुंपणात विना परवानगी विद्युत प्रवाह सोडल्याने विजेचा धक्का बसून बारकू धर्मा लांडगे (वय रा. ६८, रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com