मुळा कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कर्डिले

Nanasaheb Tuvar as the President of Radish Sugar Factory
Nanasaheb Tuvar as the President of Radish Sugar Factory
Updated on

सोनई (अहमदनगर) : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर तर उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नानंतर १९ जानेवारी रोजी 'मुळा'ची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संचालक निलेश पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी तुवर यांच्या नावाची सुचना केली.

बाळासाहेब गोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष कर्डिले यांच्या नावाची सुचना बापुसाहेब शेटे तर अनुमोदन तारा पंडित यांनी दिले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नूतन पदाधिका-यांचा सत्कार केला. यावेळी सर्व संचालक,अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

जलसंधारण मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. जिल्ह्यात सर्वप्रथम हाती घेतलेला ७५ कोटी रुपये खर्चाचा इथोनॅल प्रकल्प पूर्ण करण्याला अग्रक्रम राहील, असे अध्यक्ष तुवर यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb
Marathi News Esakal
www.esakal.com