जामखेड बस स्थानकावर एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित

वसंत सानप
Friday, 8 January 2021

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास 'नाथजल' हे नाव देण्यात आले आहे.

जामखेड (अहमदनगर) : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने 'नाथजल' ही शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण एस.टी महामंडळाचे उप आगार व्यवस्थापक सागर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचे नामकरण 'नाथजल” असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास 'नाथजल' हे नाव देण्यात आले आहे.

हे ही वाचा : खूशखबर! श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचाही प्रश्न मार्गी; निघाली कामाची ई-निविदा

संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे 'नाथजल' विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असणार आहे. अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर 'नाथजल' हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. अर्थात, त्यामुळे बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांचे पेयजल विकण्यास बंदी असेल. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याची हमी एसटी महामंडळाने उचलली आहे.
  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathjal a pure drinking water scheme at jamkhed bus stand has been inaugurated by st corporation deputy depot manager sagar shinde