देशी गायीचे दूध करते ह्रदयरोग, रक्तदाब, संधिवातावर मात

देशी गाय
देशी गाय

राहुरी विद्यापीठ : सध्या अनेक गोपालक देशी गायी पालनकडे वळताना दिसत आहे. कारण देशी गायीची रोगप्रतिकार क्षमता, उत्तम असते. दुधाची गुणवत्ता ही अतिशय चांगली असते. तसेच देशी गायीच्या दुधाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशी गायीचे दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी लक्षात घेता गोपालकांनी एकत्र येऊन दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी. तसे केल्यास आर्थिक फायदा होतो, असे निरीक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी नोंदवले.

देशी गायीचे महत्त्व आतापर्यंत सर्वांना पटू लागले आहे. हृदयविकार व संधिवात असलेल्या रुग्णांना होणार फायद्यामुळे देशी गायीची लोकप्रियता वाढली, असे डॉ. सुनील अडांगळे सांगतात. देशी गायीच्या दुधाच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाब, हृदय रोग्यांना तसेच संधिवात असणाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. वाढते दुधाचे महत्त्व बरोबरच शेतकऱ्यांनादेखील ही गाय अत्यंत फायदेशीर ठरत आहे.(Native-cows-milk-cures-blood-pressure-and-heart-disease)

देशी गाय
परवड थांबणार : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळणार ऑनलाइन

दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाई या सर्वसाधारणपणे सहा लिटर ते दहा लिटरपर्यंत सहज दूध देतात. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांचा कल घरगुती दुधासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतामध्ये गायीच्या एकूण पन्नास जाती आहेत. विविध वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता या गाईंमध्ये जास्त असून प्रतिकारशक्ती जास्त असते. उपलब्ध चाऱ्यावर दूध उत्पादनात सातत्य राहते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ऑनलाइन देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. गडाख बोलत होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, डॉ. शिवाजी पाचपुते, डॉ. संजय मंडकमाले, प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. रामदास शेंडे उपस्थित होते.

डॉ. सुनील जाधव यांनी देशी गाईंचे पोषण व आहार, डॉ. सुनील अडांगळे यांनी वर्षभरासाठी हिरवा चारा नियोजन, डॉ. शांताराम गायकवाड यांनी तणावमुक्त देशी गोपालन, डॉ. दिगंबर मोकाट यांनी देशी गाईंच्या आहारात औषधी वनस्पतींचा वापर, डॉ. मनोज आवारी यांनी समतोल आहार व घरगुती खाद्य निर्मिती आणि डॉ. रोमा मॅडम यांनी देशी गोपालनामध्ये होमिओपॅथी औषधांचा वापर या विषयावर गोपालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. धीरज कंखरे यांनी केले.आभार डॉ. सुनील अडांगळे यांनी मानले.(Native-cows-milk-cures-blood-pressure-and-heart-disease)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com