
अकोले: गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढत असून, अकोले तालुक्यातील नवलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उत्तम कामगिरी केली आहे. गुणवत्तेच्या जोरावर या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, यंदा इयत्ता पहिलीमध्ये तब्बल १०२ विद्यार्थ्यांची भरती करत ही शाळा खऱ्या अर्थाने लय भारी ठरली आहे.