
अहिल्यानगर:आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहोत. राष्ट्रवादी हा राज्यातील महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. मात्र, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तेथे आम्ही जास्त जागांवर दावा करणार आहोत. जर सन्मानाने जागा मिळाल्या नाहीत, तर त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी आज केला.