ncp jayant pawar crticize ajit pawar on statement on amol kolhe
ncp jayant pawar crticize ajit pawar on statement on amol kolheSakal

Shirdi Rally: अमोल कोल्हेंना पाडण्याचा काहींनी विडा उचललाय, पण जोपर्यंत...; जयंत पाटलांचा निशाणा

Shirdi Shibir of sharad pawar: शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दोन दिवसांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

अहमदनगर- शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दोन दिवसांच्या शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. काहींनी अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा उचललाय. पण. जोपर्यंत शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही घारबण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले आहेत. (ncp jayant pawar crticize ajit pawar on statement on amol kolhe in shirdi rally of sharad pawar)

अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात, पुणे जिल्ह्या जन आक्रोश यात्रा काढली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अमोल कोल्हे यांनी प्रामाणिकपणे शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या समोर आणला. काहींनी त्यांना पाडण्याचा विडा उचलला आहे. पण जोपर्यंत महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे तोपर्यंत त्यांनी घाबरण्याची गरज नाही. सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे, असं ते म्हणाले.

ncp jayant pawar crticize ajit pawar on statement on amol kolhe
Shetkari Aakrosh Morcha : शेतकऱ्यांची भावना समजून घेणे महत्त्वाचे - खासदार डॉ. अमोल कोल्हे

समतेचा विचार पुन्हा राज्यात रुजावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महात्मा फुले- सावित्री बाईंनी मुलींची शाळा सुरु केली. त्रास सहन केला पण ध्येयापासून ते हटले नाहीत. त्यांनी संघर्ष केला. समाज विरोधात उभा राहिला होता. पण, सत्यासाठी त्यांनी संघर्ष केला, असं ते म्हणाले.

येणारा काळ निवडणुकांचा आहे. आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपला पक्ष फोडला आहे. काही लोकं निघून गेल्याने मागच्या रांगेतील लोकांना पुढच्या रांगेत येऊन बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी सोडून गेलेल्यांचे आभार माना, अशी मिश्कील टिप्पण पाटील यांनी केली. रोहित पवार विदेश दौऱ्यावर गेले असल्याने ते शिबीराला येऊ शकले नाहीत. ते आज रात्री शिबीराला येतील, असं ते म्हणाले.

ncp jayant pawar crticize ajit pawar on statement on amol kolhe
Ajit Pawar News : अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते? अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

नवाब मलिक यांच्यावर आलेला प्रसंग आपल्याला माहितीये. अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागलं. शाहु-फुले-आंबेडकरांचा आदर्श आम्ही मानतो. शरद पवार यांनी हेच विचार मनात बाळगले आहेत. शाहूंनी आरक्षणाची भूमिका मांडली होती. मागे पडलेल्यांना त्यांनी पुढे आणलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी या सर्वांचे विचार एकत्र आणण्याचं काम करुन संविधानाचं योगदान दिलं, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com