

Trouble for Ajit Pawar Camp MLA After Complaint on Festival Remarks
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अकोल्यात त्यांच्याविरोधात समाजात धार्मिक तेढ निर्माण करून भावना दुखावल्याचा आरोप केलाय. संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे अटकेची टांगती तलवार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम जगताप यांनी अनेकदा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि प्रचार केला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संग्राम जगताप यांचे कानही टोचले होते. पण संग्राम जगताप हे त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर कायम राहिले.