esakal | राष्ट्रवादीच्या आमदारांचे श्रीराम मंदिरासाठी पाच लाख, काँग्रेसवाले म्हणतात, खंडणी वसुली सुरूय
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MLAs gave Rs 5 lakh for Shriram Mandir

आमदार अरुणकाका जगताप यांच्या परिवारातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी पाच लाख रुपये देणगी देण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी हा निधी भक्तिभावाने सुपूर्द केला. 

राष्ट्रवादीच्या आमदारांचे श्रीराम मंदिरासाठी पाच लाख, काँग्रेसवाले म्हणतात, खंडणी वसुली सुरूय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी संपूर्ण देशभरातून योगदान दिले जात आहे. विविध संघटनांकडून हा निधी संकलित केला जात आहे. सर्वसामान्य लोक तसेच भाविक आपापल्या परीने निधी देत आहेत. या निधी संकलनावरून काँग्रेसने भाजप नेत्यांवर वेळोवेळी टीका केली आहे. काही काँग्रेस आमदार तर देणगीच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप लावत आहेत.

आमदार अरुणकाका जगताप यांच्या परिवारातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी पाच लाख रुपये देणगी देण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी हा निधी भक्तिभावाने सुपूर्द केला. 

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांनी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहप्रमुख दादा वेदक यांची व आमदार संग्राम जगताप यांची भेट घडवून आणली.

हेही वाचा - दादा म्हणाले, थांबा तुमचं धोतरच फेडतो

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमदार संग्राम जगताप यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, शहर संघचालक शांतीभाई चंदे, अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे, हिराकांत रामदासी, मुकुल गंधे, राजेश झंवर, नंदकुमार शिखरे आदींकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, अभियानाचे विस्तारक प्रणव हिंगणे, सोहम शेटिया आदी उपस्थित होते.