राहुरीत कांदा निर्यात बंदीचा राष्ट्रवादीकडून निषेध

विलास कुलकर्णी
Saturday, 19 September 2020

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीचा निषेध करून, कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले.

राहुरी (अहमदनगर) : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीचा निषेध करून, कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हंटले की, "कांद्याला नुकताच चांगला भाव मिळू लागला. परंतु, शेतकरी विरोधी असलेल्या भाजपा सरकारने बिहार मधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे, कांद्याचे दर पुन्हा कोसळण्यास सुरुवात झाली. कोरोनामुळे शेतमाल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली. कष्टकरी शेतकरी कर्जबाजारी झाला. आता कांदा निर्यात बंदी केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा." अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव, महेश उदांवत, सचिन वराळे, नंदकुमार तनपुरे, शुभम थोरात, सुरज चवाळे, प्रकाश भुजाडी, नितीन तनपुरे, समिर धिमते, दीपक गाडे, अमोल गुलदगड, संग्राम तनपुरे, प्रवीण तनपुरे, सचिन गाडे यांच्या सह्या आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP protests ban on onion export in Rahuri