NCP Split : जगताप-लंके दादांसोबत; रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, लहामटे साहेबांबरोबर

मुंबईतील बैठकांमुळे जिल्ह्यातही विभागणी; रोहित पवार, प्राजक्त तनपुरे ठाम, काळे विदेशातच
Ajit Pawar Sharad PAwar
Ajit Pawar Sharad PAwarSakal

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर मुंबईत बोलावलेल्या दोन्ही गटांच्या बैठकांमुळे जिल्ह्यातील आमदार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांतही विभागणी झाली. नगरचे आमदार संग्राम जगताप व पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्र्यांची साथ केली, तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्यासोबत राहिले.

मात्र, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे दादा गटातून साहेबांकडे परतले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे अद्याप परदेशातून परतले नसल्याने भूमिका कळाली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता आहे. त्याहीपेक्षा पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. उभयतांची ही मनःस्थिती आज दिसून आली. उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला नगर जिल्ह्यातून दोन आमदार व त्यांचे समर्थक उपस्थित होते.

शरद पवार यांच्या गटात तीन आमदारांचे बळ होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण सहा आमदार आहेत. दुफळीमुळे त्यांच्यात विभागणी झाली आहे.

अजित पवार यांनी शपथ घेतल्यापासून नगरचे आमदार जगताप हे त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जगताप यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अकोल्याचे आमदार लहामटे यांची मात्र द्विधावस्था आहे.

Ajit Pawar Sharad PAwar
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

आज ते शरद पवार यांच्या गोटात दिसले. संपूर्ण पवार कुटुंबावर श्रद्धा असल्याचे सांगणाऱ्या आमदार लंके यांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणे पसंत केले. तनपुरे आणि रोहित पवार प्रारंभीपासूनच दादांपासून दूर राहिले.

कोपरगावच्या काळे यांनी, आपण साहेबांसोबत असल्याचे परदेशातून कळवले होते. मात्र, ते अद्यापि ते परतले नाहीत. ते आल्यावरच भूमिकेबाबत स्पष्टपणे सांगता येईल.

Ajit Pawar Sharad PAwar
NCP Political Crisis: बुडत्याचा पाय अधिक खोलात! राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात करावी लागणार कसरत

बाँड लिहून दिला

बैठकीत पक्षसंघटनेस नव्याने उभारी देण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून निष्ठेबाबत बाँड लिहून घेण्यात आला. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नगर जिल्ह्यात लवकरच शरद पवार यांचा प्रचारदौरा आखण्यात येणार असल्याचे समजले.

कार्यकर्त्यांनो, खचू नका : गंधे

राज्यात ज्या राजकीय घडामोडी होत आहेत, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने दूरदृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये.

Ajit Pawar Sharad PAwar
Ahmednagar Crime : ज्याला जन्म दिला, पोटाला चिमटे घेऊन लाडात वाढविले, त्यानेच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे सुरूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या, तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचाच होईल, अशी ग्वाही मी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात देतो, असे आश्वासक प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिले.

शहर भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी महेंद्र गंधे बोलत होते.

Ajit Pawar Sharad PAwar
Ahmednagar Crime : कामठीतील मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

या कार्यक्रमात अॅड. विवेक नाईक यांची पक्षाच्या प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्तीबद्दल, जैन ओसवाल पतसंस्थेच्या संचालकपदी संतोष गांधी व जिल्हा मराठा पतसंस्थेच्या संचालकपदी उदय अनभुले यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून सत्कार केला.

यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, प्रदीप परदेशी, अजय चितळे, श्रीगोपाल जोशी, बाळासाहेब भुजबळ, अजय ढोणे, शशांक कुलकर्णी, दत्ता गाडळकर, मल्हार गंधे, सुमीत बटोळे, श्रीकांत फंड आदी उपस्थित होते.

आगरकर म्हणाले, की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे व देशाचे हित पाहून योग्यच निर्णय घेतले असतील. प्रत्येक पक्षात संक्रमणकाल येतोच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. महेंद्र गंधे, विवेक नाईक, संतोष गांधी, उदय अनभुले यांचे चांगले काम सुरू आहे.

कोण आले, कोण नाही?

मुंबईतील आजच्या बैठकांची स्थिती पाहिली, तर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रतिनिधींनी शरद पवारांसोबत जाणे पसंत केले. कर्जत-जामखेड, अकोले, श्रीगोंदे, नगर, पाथर्डी, राहुरी, कोपरगाव व राहाता येथील पदाधिकारी, कार्यकर्तेही सोबतीला होते. श्रीरामपूर, नगर शहर, पारनेर, संगमनेरमधील पदाधिकारी अजितदादांच्या बैठकीस गेल्याचे दिसले. शेवगाव, नेवाशातील पदाधिकाऱ्यांबाबत माहिती मिळू शकली नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले.

शरद पवारांकडे कोण?

श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप, नगरमधून दादा कळमकर, रोहिदास कर्डिले, सीताराम काकडे, किसनराव लोटके,

कर्जतमधून राजेंद्र गुंड, जामखेडचे मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, पाथर्डीतून प्रताप ढाकणे, महिला आघाडी अध्यक्ष योगिता राजळे, राहात्यातून रावसाहेब म्हस्के, महेंद्र शेळके, अकोल्यातून तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे आदी प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलावलेल्या बैठकीस हजर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com