NCP Political Crisis: बुडत्याचा पाय अधिक खोलात! राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात करावी लागणार कसरत

NCP Political Crisis
NCP Political Crisisesakal

NCP Political Crisis : शिवसेनेतून शिंदे गट, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट स्वतंत्र झाल्याने राज्याच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरदेखील दिसून येणार असून, नाशिकबाबत विचार केल्यास शहरातून नाव डुबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.

सध्याची परिस्थिती बघता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यापेक्षा खालावत असल्याचे दिसून येत आहे. (NCP Political Crisis have to exercise in city NMC election nashik news)

शहरात भाजप शिवसेनेने शहरी राजकारणावर जेवढी पकड निर्माण केली, तेवढी पकड राष्ट्रवादी काँग्रेसला निर्माण करता आलेली नाही. यापूर्वी काँग्रेसची शहरी भागात ताकद होती मात्र ती वर्षागणिक क्षीण होत गेली.

शहरी भागातील ताकद महापालिका किंवा नगरपालिकेमध्ये त्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले यावर मोजली जाते. शिंदे व अजित पवार गट हे दोन्ही राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे घटक ठरणार आहे.

येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता, शहरामध्ये शिंदे गट व अजित पवार गटामुळे शिवसेना व मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आधीच क्षण झालेली ताकद आणखी क्षीण होणार आहे. शहरात एकूण चार विधानसभेचे मतदारसंघ आहे. त्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघात नाशिक महापालिका हद्दीतील काही भाग येतो.

मतदारसंघनिहाय विचार करतात पूर्व मध्य व पश्चिम मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शहरी भागात ताकद वाढविण्यासाठी आधीच मोठी कसरत करावी लागत असताना त्यात पुन्हा आता गटबाजीची मोठी भर पडल्याने बुडत्याचा पाय अधिक खोलात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP Political Crisis
Ajit Pawar : ना शरद पवार, ना अजित पवार! सरोज अहिरे नाशिकला परतल्या; कारण आलं समोर

आकडा टिकविणे मुश्‍कील

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिक महापालिकेची निवडणूक २००२ मध्ये लढविली गेली, त्या वेळी २३ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसचे ही सर्वात मोठी आकडेवारी ठरली.

त्यानंतर २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये सुधारणा होत, वीस नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मात्र नगरसेवक निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला.

२०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे सहा नगरसेवक निवडून आले. अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटात नोंदणी केल्याने एकने संख्या वाढली.

आता पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला आहे तो आकडा टिकविणेदेखील मुश्कील राहील, अशी परिस्थिती नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींवरून दिसते.

NCP Political Crisis
Ajit Pawar NCP : प्रतिज्ञापत्रच घेतलं! अजित पवारांकडे 44 आमदारांचं संख्याबळ?, थोड्याच वेळात सोक्षमोक्ष

भुजबळ की पवार ?

नाशिक शहरातील काही भाग व शहराच्या हद्दीतील ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु महापालिका हद्दीतील ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या शून्य आहे.

शहराच्या ग्रामीण भागातील शरद पवार यांना मानणाऱ्या मतदानाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येतो. महापालिकेच्या निवडणुकीत मात्र प्रभाव दिसत नाही. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले आहे.

संजय साबळे यांनी यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. सिडकोतील राजेंद्र महाले यांच्यावर भाजप व शिवसेना गळ टाकून आहे. तेदेखील दोन्हीही पक्षांच्या संपर्कात आहे. गजानन शेलार यांनी शरद पवार यांच्यामागे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

सुफी जीन व समिना मेमन हे दोन्ही नगरसेवक भुजबळांचे मानले जातात. नाशिक रोड भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार यांचा कलदेखील भुजबळ गटाकडे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची तोडफोड होण्यापूर्वी शहरात काही प्रमाणात का होईना ताकद वाढेल असे दिसून येत होते. परंतु, आता मात्र आहे त्या जागा टिकविणेदेखील मुश्कील असेल असे बोलले जात आहे.

NCP Political Crisis
Sharad Pawar NCP : ‘आम्ही सारे शरद पवारांचेच सांगाती...’ हरिहरराव भोसीकर; जिल्हाध्यक्षांसह १५ तालुकाध्यक्षांचा पाठिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com