नेवासे : गडाखांचा मुरकुटे गटाला ‘दे धक्का’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nevase

नेवासे : गडाखांचा मुरकुटे गटाला ‘दे धक्का’

नेवासे : गेल्या सहा महिन्यांपासून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाला लागलेली ओहोटी थांबायला तयार नाही. बेलपिंपळगाव पंचायत समिती गणातील मुरकुटे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी आज माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करून हातात शिवबंधन व गळ्यात भगवे उपरणे घालून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गडाख यांचे मंत्रिपद गेले असले, तरी तालुक्यात विकासकामांचा धडाका पाहून कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहेत. आज गोधेगाव दौऱ्यात मुरकुटे गटातील नवनाथ पठाडे, दत्तात्रेय शेळके, रमेश चौधरी, महिपत शेळके व बाळासाहेब आहेर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे बेलपिंपळगाव पंचायत समिती गणात गडाखांची बाजू अधिकच मजबूत झाली आहे.

गोधेगाव येथे माजी मंत्री गडाख यांचे आगमन होताच युवकांनी जल्लोषात स्वागत करून गावातून मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजकारण नाही तर विकासकामांसाठी मी नेहमी कटिबद्ध असतो. गोधेगाव साठी महत्त्वाच्या असणारी घोगरगाव पाणी योजनेसह विविध कामास निधी दिलेला आहे.पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांचा निश्चित सन्मान केला जाईल, असे गडाख यांनी सांगितले. कार्यक्रमास गोधेगावचे सरपंच राजेंद्र गोलांडे, ‘मुळा’चे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, शिंगवे तुकाईचे माजी सरपंच योगेश होंडे, सुदाम तागड उपस्थित होते. प्रास्ताविक बाळकृष्ण भागवत यांनी केले. दिलीप शेलार यांनी आभार मानले.

विरोधकांकडे फक्त शिव्याशाप देण्याचे भांडवल आहे. व्यक्तिगत पातळीवर टीकेचा हल्ला होत असला, तरी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी डगमगून जाणार नाही.

- शंकरराव गडाख, माजी जलसंधारणमंत्री

भूलथापा आणि मतलबी राजकारणात आम्ही आयुष्याचे अनेक दिवस वाया घातले. आजच्या प्रवेशाने आम्ही विकासकामांशी जोडले गेल्याचा आनंद आहे. गडाखांचे हात बळकट केले जातील.

- नवनाथ पठाडे, प्रवेश केलेला कार्यकर्ता

Web Title: Nevase Politics Program Gadakh Murkute Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..