

Girija Pichad in discussion with Balasaheb Thorat — meeting sparks political talk in Akole.
Sakal
-शांताराम काळे
अकोले : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री स्व. मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड-म्हात्रे यांनी आज काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला आरक्षण आल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीता भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गिरिजा पिचड यांच्याकडून थोरात भेटीमागे तालुक्यात व जिल्ह्यात वेगवेगळे अर्थ काढण्यात येऊ लागले आहेत.