Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

Torrential Rains Lash Newasa Taluka: काही गावांत वादळी वारे आल्याने कांदा भिजला. मुळाथडीतील पानेगाव, करजगाव, अंमळनेर, खेडलेपरमानंद व शिरेगाव भागात पहाटेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. शेत, कालवा व रस्ते चिखल व दलदल झाली आहे.
Newasa taluka battered by heavy rain; farmers and onion growers struggle after crop damage.

Newasa taluka battered by heavy rain; farmers and onion growers struggle after crop damage.

Sakal

Updated on

सोनई : दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवार (ता.१३) रात्री नेवासे तालुक्यातील सर्व मंडलात सलग आठ तास धो-धो पाऊस झाला. या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अनेक गावांतील ओढे-नाले वाहते झाल्याने गाव आणि वाड्या-वस्त्यांचे रस्ते काही तास वाहतुकीस बंद होते. कुकाणे मंडलात सर्वाधिक, तर सर्वांत कमी पाऊस चांदे मंडलात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com