

Heavy traffic and decorated wedding venues in Newasa during the peak wedding muhurat.
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : तुलसी विवाहानंतर सर्वत्र विवाह सोहळ्याची धूम सुरू झाली. पाच डिसेंबर नंतर पन्नास दिवस विवाहाची तीथ नाही. त्यामुळे आज रविवारच्या तिथीवर सर्वाधिक लग्न सोहळे झाले. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत ‘लगीनघाई’ने सर्व रस्ते गजबजून गेले होते. अनेक रस्त्यावर असलेले खड्डे व उसाच्या वाहतुकीमुळे अनेकांना लग्नस्थळी वेळेवर पोहोचता आले नसल्याचे पाहण्यास मिळाले.