
-विनायक दरंदले
सोनई : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून सोडण्यात आलेले पाणी नेवासे तालुक्यातील सर्व गावे ओलांडून प्रवरासंगम-टोका येथील संगम परिसरात पोहोचले आहे. मुळा आणि प्रवरा नद्या दुथडी भरून वाहत असल्याने लाभक्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. मार्गावर असलेल्या सर्व मोठ्या पुलांवर पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.