NIE Eco Ganesha workshop 2023 : चिमुकले हात साकारणार इवलेसे गणपती

रविवारी इको गणेशा कार्यशाळा ः ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजन
NIE Eco Ganesha workshop 2023 Ganesha idols will make by children
NIE Eco Ganesha workshop 2023 Ganesha idols will make by childrenSakal

अहमदनगर : चिमुकल्या हातांनी गणपतीची मूर्ती साकारताना त्यांची कलात्मकता दिसून येते. अशा कलांना वाव मिळावा, स्वतः मूर्ती साकारताना व ती पूर्णत्वाला आल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच असतो. अशा कलांना वाव देण्यासाठी ‘सकाळ’ कायम पुढाकार घेते. त्याचाच भाग म्हणून रविवारी (ता. १०) इको गणेशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सकाळ एनआयई''च्या (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी सकाळी अकरा वाजता अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल येथे ‘इको गणेशा’ ही कार्यशाळा होणार आहे. शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करून तिची घरी प्रतिष्ठापना करण्याची संधी या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

हे आणा साहित्य

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाडूमाती दिली जाईल. मात्र, वहीचा जुना पुठ्ठा, छोटी वाटी, स्केचपेन, पट्टी, कटर, बॉलपेन, पेन्सिल, ब्रश, जुनी रिफिल, जुने कापड, टूथपीक, आइस्क्रीम स्टीक आदी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. या कार्यशाळेस डॉ. सुज्योत सैंदाणे मार्गदर्शन करणार आहेत.

एनआयईच्या सभासदांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य आहे. सभासद नसणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी लायन्स क्लब व बन्सी महाराज मिठाईवाले (अहमदनगर) यांनी प्रायोजकत्व दिले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,

यासाठी ही कार्यशाळा मोलाची ठरणार आहे. सकाळ एनआयईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य, लेखनकौशल्य, संवादकौशल्यवाढीच्या प्रयत्नांसह वैविध्यपूर्ण कार्यशाळांच्या माध्यमातून विविध विषयांवर संवाद साधला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार लेखन, चित्रांद्वारे मांडण्यास प्रवृत्त केले जाते. वर्षभरात खास अंक प्रकाशित केले जातात. नावनोंदणी व संपर्क : शिल्पा धोपावकर (मोबाईल ः ९८९०६११२९१)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com