कोरोना महामारीतही आमदार लंकेंचा विकासकामांचा धडका

१६ कोटी रूपयांची विविध कामे मंजूर
आमदार नीलेश लंके
आमदार नीलेश लंकेई सकाळ

पारनेर- गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे विकास कामांच्या निधीला कात्री लावण्यात आलेली असली तरी आमदार निलेश लंके (nilesh lanke) यांनी मात्र स्थानिक विकास निधी तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मतदार संघासाठी १६ कोटी ३४ लाख ८५ हजार इतका भरीव निधी मिळविले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून लंके यांनी विकास कामांसाठी निधी मिळवण्यात यश मिळविले. कोरोना रूग्णांच्या सेवेबरोबरच विकास कामांकडेही आपले लक्ष असल्याचे यातून लंके यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.(Nilesh Lanka sanctioned works worth Rs 16 crore)

आमदार नीलेश लंके
गोड-धोड पंगतीशिवायच ऊसतोडणी कामगार माघारी

स्थानिक विकास निधीतून मंजुर करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे :

पिंपळनेर : विठ्ठल मंदीरासमोर सामाजिक सभागृह १५ लाख, वाघुंडे खुर्द : दळवी वस्ती ते वाघुंडे रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, निघोज : दळवी मळा ते चेडे वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण १० लाख, वारणवाडी : गणेश मंदीरासमोर सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, गाजदीपूर : आगनाई देवी मंदीर सामाजिक सभागृह ५ लाख, म्हसोबा झाप : भोसर मळा मळगंगा मंदीर सामाजिक सभागृह ५ लाख, म्हसोबा झाप : खताळवाडी येथे गणपती मंदीर सामाजिक सभागृह ५ लाख, वडगांवआमली : वडगांव ते हिवरेबाजार रस्ता खडीकरण १५ लाख, खडकवाडी : हनुमानमंदीरासमोर काँक्रीटीकरण १५ लाख, पाडळीतर्फे कान्हूर : पाडळी ते लाटेमळा रस्ता इनाम ओढयावर २ सिडी वर्क (पुल) बांधणे १४ लाख, रेनवडी : जांभळीवस्ती रस्ता खडीकरण १५ लाख, गारगुंडी : गारगुंडी फाटा ते गारगुंडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २० लाख, कासारे मारूती मंदीर सामाजिक सभागृह १० लाख

जिल्हा नियोजन मंडळामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे :

जामगांव : हडवळा वस्ती येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा ३६ लाख ६५ हजार, जामगांव : मेहेर वस्ती येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ४८ लाख ६९ हजार, हंगे : दळवी वस्ती येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ५१ लाख ५४ हजार, रांजणगांव मशिद : मावळे वस्ती येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ४७ लाख १९ हजार, रांजणगांव मशिद : रानमाळ वस्ती कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे ५४ लाख ३० हजार, रांजणगांवमशिद : रूई शिवस्ती येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे १ कोटी १० हजार, रांजणगांव मशिद : लोणकर वस्ती येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे ९२ लाख ६७ हजार, रूईछत्रपती : महादेवमंदीर येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे ७६ लाख ४६ हजार.

शिरापूर : मळगंगा मंदीर येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ७७ लाख ५९ हजार, चोंभूत : खानीचा ओढा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ४६ लाख ७४ हजार, चोंभूत : दरोडी नाला येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ७४ लाख १८ हजार, कोहकडी : झरेकर मळा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ५६ लाख ६५ हजार, जवळे : खवडी मळा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ४५ लाख ८० हजार, भोयरे खुर्द : कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ६० लाख ४८ हजार, पिंपळगांव कौडा : दिवटे मळा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ५९ लाख ०५ हजार.

पिंपळगांव कौडा : माळयाचा मळा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ६० लाख, अकोळनेर : जाधवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे १ कोटी ७ हजार, वडगांव गुप्ता : कोल्हापूर पद्धतीचा बंधारा डोंगरे वस्ती ६४ लाख ०७ हजार, सुपे : वाळवणे रस्त्यावर स्मशानभुमीजवळ पुल बांधणे एक कोटी ६० लाख ५१ हजार, पारनेर : जामगाव रस्त्यावरील गावनदी येथे पुल बांधणे एक कोटी ६८ लाख २० हजार.(Nilesh Lanka sanctioned works worth Rs 16 crore)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com