
पारनेर : राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, याकडे संसदेमध्ये लक्ष वेधले होते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.