

Push for Progress: Ahilyanagar Railway Projects Need Momentum, Says MP Lanke
Sakal
पारनेर: अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असलेले आठ प्रमुख रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावेत. प्रलंबित प्रस्तावांची अद्ययावत स्थिती तातडीने कळवावी आणि त्या कामांना गती द्यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांनी ही मागणी पत्राद्वारे केली.