पाथर्डी : पाथर्डी पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री प्रचारासाठी आले, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव, लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्याबाबत एकही शब्द न बोलता आम्ही आजपर्यंत एवढा निधी दिला, हे केले, ते करू, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली..राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्चित...राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे आणि सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार नीलेश लंके, प्रताप ढाकणे, बंडू बोरुडे, शिवशंकर राजळे, नासीर शेख, योगिता राजळे, प्रभावती ढाकणे, ऋषिकेश ढाकणे आदींसह सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते..मागील काही वर्षांत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला आला; परंतु येथील सत्ताधाऱ्यांनी ठराविक ठेकेदारांना ठेका देत स्वतःचे खिसे भरण्याचे केले. शहरात ठराविक ठेकेदाराची मक्तेदारी आहे का? सर्वसामान्य आणि गरिबांसाठी पालिकेने नेमके काय केले, ही निवडणूक ठेकेदार विरुद्ध सर्वसामान्य, अशी असल्याने यांना घरी पाठविण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रताप ढाकणे म्हणाले..होता स्कार्फ म्हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्.. .१९८० साली स्व. बबनराव ढाकणे यांनी वृद्धेश्वर कारखाना जिंकला; परंतु त्यानंतर पुन्हा हा कारखाना राजळे यांच्या ताब्यात दिला. १९८५ साली वृद्धेश्वर कारखान्याला अडचण होती, त्यावेळेस स्व. ढाकणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे हट्ट करत मदत केली, हे विसरून नका आणि मला जास्त बोलायला भाग पाडू नका, असेही ढाकणे म्हणाले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.