esakal | घुलेवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर; राजकीय क्षेत्रात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

ghulewadi sarpanch

घुलेवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संगमनेर (जि.अहमदनगर) : घुलेवाडीचे (ता. संगमनेर) लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्‍वास ठराव (ता.५) बोलावलेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. राऊत थेट जनतेतून निवडून आल्याने ठरावाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. (No-confidence-motion-passed-against-Ghulewadi-sarpanch-marathi-news)

तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख

संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूह, राजहंस दूध संघ, कामगार वसाहत, संगमनेर महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था व संगमनेर शहरातील विस्तारित वसाहतींचाही घुलेवाडीत सहभाग आहे. राजकीय दृष्टिकोनातून तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून तिची ओळख आहे.

साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून अपक्ष उमेदवार सोपान राऊत निवडून आले होते. त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर आज मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजून १६, तर ठरावाच्या बाजून सरपंचासह दोन मते मिळाली. लोकनियुक्त पदाधिकाऱ्यावर अशा पद्धतीने अविश्‍वास ठराव मंजूर होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याने, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: शैक्षणिक संस्थांचा प्रवेशासाठी 'हायटेक' प्रचार!

हेही वाचा: हेलिकॉप्टरने आली लग्नाची वरात! वरासोबत डॉ. अमोल कोल्हेही

loading image