'ईडी'चं टेन्शन नाही, शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू

चौकशीनंतर मंत्री प्राजक्त तनपुरेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरेsakal

राहुरी : "ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. टेन्शन घेण्याचे कारण नाही. शरद पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. याचा अभिमान आहे. तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व जागांवर दैदीप्यमान विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे." असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

राहुरी येथे राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिरात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती, तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव, धीरज पानसंबळ, धनराज गाडे, सभापती बेबी सोडनर, विठ्ठल मोकाटे, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, विजय कातोरे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, "तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट, राहुरी पालिकेत तीन प्रभाग वाढणार आहेत. त्यांची रचना कुणालाही माहिती नाही. त्यामुळे, इच्छुकांनी दमाने घ्यावे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. उमेदवार ठरल्यावर एकदिलाने काम करावे. राहुरीतील जॉगिंग ट्रॅकसाठी आणखी दोन कोटी रुपये व शहरातील चौक, बगीचे सुशोभीकरणासाठी ५० लाख असा अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे."

"राहुरीच्या बसस्थानकासाठी अर्थसंकल्पात १७ कोटींची तरतूद केली होती. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वळविल्याने काम प्रलंबित आहे. त्यावर लवकरच तोडगा काढू. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा वाद लवकरच मिटणार आहे. येत्या काळात रुग्णालय इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल. राहुरी शहरातील भुयारी गटार योजनेचे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागेल." असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

शरद पवार राज्यातील राजकारणाचे महानायक आहेत. त्यांची साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात अतुलनीय कामगिरी आहे. एकट्याने नव्हेतर शंभर जणांना घेऊन चालणारे त्यांचे विकासात्मक नेतृत्व आहे.

- जितेश सरडे,

प्रदेशाध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com