नागरिकांसाठी पक्ष एकवटले

दत्ता इंगळे
गुरुवार, 4 जून 2020

नगरच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत, दर वर्षी नगर तालुका लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. त्याचे तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी स्वागत केले. निर्णयास पाठिंबा दिला. काहींनी पंचायत समितीच्या निर्णयाला ग्रामसभेत एकमुखी ठराव करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

नगर ः नागरिकांच्या आरोग्यासाठी व खबरदारी म्हणून पंचायत समितीतर्फे वर्षातून एकदा आठ दिवस नगर तालुका लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरात नगर तालुक्‍यातील अनेक गावांनी सूर मिसळवीत, पक्षीय भेद बाजूला ठेवले आहेत. त्यामुळे आता वर्षातून एकदा आठ दिवस नगर तालुका लॉकडाउन राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नगरच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत, दर वर्षी नगर तालुका लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. त्याचे तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी स्वागत केले. निर्णयास पाठिंबा दिला. काहींनी पंचायत समितीच्या निर्णयाला ग्रामसभेत एकमुखी ठराव करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावागावांतील नागरिकांनीही ग्रामपंचायतींना, या निर्णयाची अंमलबजावणी करा; आम्ही सहकार्य करू, असे सांगितले. त्यामुळे गावापुढाऱ्यांनाही बळ मिळाले असून, आगामी ग्रामसभांमध्ये हा निर्णय घेणार असल्याचे ते सांगत आहेत. 

 

अवश्य वाचा ः नागरिकांसाठी पक्ष एकवटले

पंचायत समितीचा निर्णय गावांच्या हितासाठीच आहे. त्यांचा निर्णय चांगला असल्यामुळे त्याला आमची साथ राहणार आहे. या निर्णयाचे काटेकोर पालन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत वाळकीच्या सरपंच स्वाती बोठे यांनी व्यक्त केले. 

 

नागरिकांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा लॉकडाउन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन, नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निर्णयाला आम्ही सहकार्य करणार आहोत, असे मत डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे यांनी व्यक्त केले. 

 

क्लिक करा ः जिल्हा परिषदेला ही डोकेदुखी ... शाळा सॅनिटाइझ करायच्या कशा

 

नगर तालुक्‍यासह शहरही या काळात बंद ठेवण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले तर गावेच नव्हे, तर संपूर्ण राज्यही आठ दिवस बंद राहू शकते, असे मत कामरगावच्या सरपंच स्वाती साठे यांनी व्यक्त केले. 

निसर्गसंवर्धनासाठी लॉकडाउन महत्त्वाचे ः पोपटराव पवार

निसर्गसंवर्धनासाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी लॉकडाउन महत्त्वाचे आहे. हिवरेबाजारने हा निर्णय पूर्वीच घेतला असून, पंचायत समितीने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण राज्यातील इतर तालुक्‍यांनी करणे गरजेचे आहे. 
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती 

काटेकोर अंमलबजावणी गरजेची ः पवार
लॉकडाउनचा निर्णय पंचायत समितीने घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हा फक्त निर्णय होऊन उपयोग होणार नाही, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 
- शरद पवार, उपसरपंच, चिचोंडी पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No politics for the health of the citizens