"Not because of their 'negligence' invite that 'guest
"Not because of their 'negligence' invite that 'guest

"यांच्या' हलगर्जीपणामुळे नको "त्या' पाहुण्याला आमंत्रण 

नगर ः कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने शहरातील तोफखाना परिसर हॉट स्पॉट केला; परंतु परिसर "सील' असतानाही पत्रे उचकटून विनाकारण भटकणाऱ्यांचाही वावर त्या भागात मोठ्या प्रमाणात वाढला. नियुक्त केलेले पोलिसदादा नुसतीच बघ्याची भूमिका घेत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तोफखान्यातील कोरोनाचा वेग भलताच वाढत चालला आहे. दुसरीकडे "टार्गेट' दिल्याचा आव आणून नागरिकांची वाहने पकडून नाहक दंडाची वसुली करण्यातच पोलिस मश्‍गूल असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. 

शहरासह जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत, त्या ठिकाणचा परिसर पत्रे ठोकून "सील' केला जातो. प्रतिबंधात्मक आदेश म्हणून पोलिसांच्या त्या ठिकाणी नियुक्‍त्या केल्या जातात. परंतु बहुतांश ठिकाणी पोलिस वेळकाढूपणा करीत आहेत. हॉट स्पॉट परिसरातील नागरिकांवर वॉच ठेवायचा, तर खाली मान घालून मोबाईल चाळत बसण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. हॉट स्पॉट परिसरातील नागरिक सील केलेल्या परिसरातून पत्रे उचकटून बाहेर नित्यनियमाने फिरून येत आहे. ड्यूटी लावलेले पोलिस साधे अडवण्याचेही धाडस करीत नाहीत. बागडपट्टी परिसरातून बाहेर पडणारे काही महाभाग पोलिसांचे निकटवर्तीय असल्यासारखे वावरतात. परिणामी तोफखाना परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढत आहे. परिसर सील करूनही कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. 

दंडवसुलीत आघाडी 
"सील' केलेल्या भागात कर्तव्य बजावताना पोलिसांच्या जिवावर येत आहे. दुसरीकडे वाहने अडविताना मात्र कुठलीही कुचराई होत नाही. नाहक नागरिकांना परेशान करून दंड वसूल करण्याचा धडाका पोलिसांना चांगला जमत असल्याचीही चर्चा आहे. 

संपादन ः विनायक लांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com