दरोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

मनोज जोशी 
Tuesday, 26 January 2021

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते.

कोपरगाव (अहमदनगर) : स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पांड्या ऊर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने आरोपी भगीरथ भोसले, हिरू भोसले (दोघे रा. पढेगाव) यांनी 7 जुलै 2019 रोजी सावळगाव (कोपरगाव) शिवारात बोलावून घेतले. तेथे मारहाण करून त्यांच्याकडील 10 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारीचे कलमे वाढवली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यातील आरोपी पांड्या भोसले पढेगाव येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A notorious robber has been arrested in Kopargaon