esakal | नगरमध्ये आज कोरोनाचा आकडा ४०३, इथे इतके तर तिथे...
sakal

बोलून बातमी शोधा

The number of corona in Ahmednagar today is 403

जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. 

नगरमध्ये आज कोरोनाचा आकडा ४०३, इथे इतके तर तिथे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात काल (शनिवार ) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. 

हेही वाचा - भंडारदरापूर्वी सीना धरण भरले

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या  २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा ३३ बाधीत रुग्ण आढळून आले. यामध्ये, नगर शहर (१५) भिस्तबाग - १,  शहर -१,  मिलिटरी हॉस्पिटल -१३ , अकोले १० -  कळस -9, उंचखडक -1.
पारनेर ०७ -  सुपा-२ पारनेर -३, रायतळे-१ गंजभोयरे -1, कर्जत ०१- सुपेकरवाडी येथे रुग्ण आढळून आले.
 
अँटीजेन चाचणीत आज १९५  जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, संगमनेर १६,   पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपुर १७ कॅन्टोन्मेंट १२, नेवासा २०, श्रीगोंदा १७, पारनेर १०, अकोले ०४, शेवगाव १२,  कोपरगाव ३७, जामखेड ०३ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११८, संगमनेर ०७, राहाता ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, श्रीगोंदा ०२, पारनेर ०४, अकोले ०४, शेवगाव ०२ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांचा समावेश आहे.

क्लिक करा - सात-बारानंतर आता आठ अ

दरम्यान, आज एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर ०२, राहाता ०५,पाथर्डी १४, नगर ग्रा. ०७, श्रीरामपूर ०५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ०३, राहुरी ०१,शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड ०३, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: ३७६२

उपचार सुरू असलेले रूग्ण: २०७१

मृत्यू: ७८. एकूण रूग्ण संख्या: ५९११

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

संपादन - अशोक निंबाळकर

loading image