esakal | साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद; कर्मचारीही साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये वर्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

The number of patients undergoing covid treatment in Shirdi taluka crossed the 900 mark on Wednesday

याबाबत तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार आजपासून बंद करण्यात येणार आहेत.

साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद; कर्मचारीही साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये वर्ग 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (अहमदनगर) : राहाता, शिर्डी व लोणी ही तीनही मोठ्या लोकसंख्येची गावे कोविडचा हॉटस्पॉट ठरली आहेत. तालुक्‍यात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येने बुधवारी नऊशेचा आकडा पार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपासून साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी कोविड सेंटरच्या सेवेत पाठविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने मिनी लाॅकडाऊन मागे घेण्याची मागणी

याबाबत तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार आजपासून बंद करण्यात येणार आहेत. तेथील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना साईसंस्थान कोविड रुग्णालयात नियुक्त करण्यात येणार आहे. आता कोविड केअर सेंटरमध्ये सहाशे खाटा, डेडिकेटेड कोविड हेल्थसेंटरमध्ये ऑक्‍सिजन सुविधा असलेल्या चाळीस खाटांसह एकूण एकशे चौदा खाटा, तसेच डेडिकेटेड कोविड रुग्णालयात तीन व्हेंटिलेटच्या सुविधेसह पन्नास खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. आज राहाता शहरातील जनरल सर्जन डॉ. किरण गोरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दत्ता कानडे व साकुरी येथील डॉ. व्ही. एम. वाणी यांनी ऑक्‍सिजन बेडची सुविधा असलेली कोविड रुग्णालये सुरू केली. 

फरार बोगस डॉक्‍टरला अटक

दरम्यान, साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना व्हेंटिलेटर टेक्‍निशिअन तातडीने उपलब्ध करावेत, चाळीस रुग्णांमागे किमान दोन डॉक्‍टर असावेत, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नातेवाईकांच्या मुक्त वावराला आळा घालावा, खासगी व सरकारी, असा भेद न करता तालुक्‍यातील सर्व एमबीबीएस डॉक्‍टरांची येथे नियुक्ती करावी, अशी मागणी एका डॉक्‍टरने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'शी बोलताना केली. 

रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. नऊशे रुपये किमतीचे इंजेक्‍शन साडेतीन हजार रुपये मोजूनही मिळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.
- नीलेश कोते, उपनगराध्यक्ष, शिर्डी

loading image