आमदार विखेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकर्ते झाले आक्रमक

Offensive post against MLA Vikhe
Offensive post against MLA Vikhe

संगमनेर : माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या प्रवृतीचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.आमदार विखे यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील मजकूर टाकणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी  केली आहे.

भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बातमीचा मजकूर फेसबुकवरील एका वेबपेजवर प्रसारीत झाला.या मजकूरावर  प्रतिक्रियेची पोस्ट  जय बरगे या व्यक्तीने आपल्या फेसबुक युजर अकौंटद्वारे नोंदविली.परंतु बरगे यांनी जाणीवपूर्वक आ.विखे पाटील यांची बदनामी करणारी हीन दर्जाची पोस्ट वाईट टाकून आ.विखे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

या पोस्टमुळे नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि विखे पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.       

सद्या परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी  मोठया संख्येने कार्यकर्ते जमवून आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी संयम आणि शांतता ठेवावी असे आवाहन आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात  तक्रार दाखल करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला.

  भाजपाचे उतर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी  या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून शिर्डी पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.सोशल मिडीयावरून  विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांना धमकी आणि आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची बदनामी करणारा मजकूर प्रसारीत करण्याचे  षडयंत्र असून  या प्रवृतींना  पोलीसांनी कठोर शासन करावे आशी मागणी करून भाजपा नेत्यांच्या बदनामीचे कारस्थान थांबले नाहीतर  कार्यकर्त्यांना रस्त्यावर येवून  आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहाणार नाही असा इशारा राजेंद्र गोंदकर यांनी दिला.

    यासंदर्भात राहाता संगमनेर आणि आश्वी पोलीसांकडे  विखे समर्थक कार्यकर्त्यांनी जय बरगे (कोल्हापूर) या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. संगमनेर येथे भाजपाचे माजी अध्यक्ष राजेश चौधरी आणि माजी नगरसेवक किशोर नावंदर यांनी शहर पोलीसांकडे जय बरगे यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी शहराचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची भेट घेवून केली.

आश्वी येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करून जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे आणि रविंद्र गाडे यांनी आमदार विखे पाटील यांच्या विरोधात अश्लील मजकूर टाकणाऱ्या प्रवृती विरोधात  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हातगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्यातही भागवत देवसरकर यांनी  तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली.

राहाता शहरातील कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात सदर व्यक्तिने आ.विखे पाटील यांच्या केलेल्या बदनामीमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, सोशल मीडियावर सातत्याने आ.विखे पाटील यांच्या  बदनामीचे मजकूर  टाकणाऱ्या या व्यक्तीविरोधात विलंब न करता कारवाई करण्याची मागणी केली आहे. दशरथ तुपे यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com