किराण्यावाला कोयटे दर्जेदार घरे काय बांधणार? अपमान जिव्हारी लागला अन इतिहास घडला

मनोज जोशी
Sunday, 4 October 2020

निवारा सोसायटीतील 273 सभासदांच्या नावावर सात-बारा करून त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

कोपरगाव : (अहमदनगर) "किराणा मालाच्या पुड्या बांधणारा काका कोयटे सर्वसामान्य कुटुंबांसाठी कमी खर्चात, दर्जेदार घरे काय बांधणार, अशी खिल्ली 1982मध्ये काही जणांनी उडवत अपप्रचार केला. सोसायटीअंतर्गत सुसज्ज रस्ते, पथदिवे, भूमिगत गटारे, खेळाचे मैदान, बागेसह सर्व सोयी-सुविधांनी युक्त 273 सभासदांची घरे बांधली.

35 वर्षांनंतर निवारा हाउसिंग सोसायटीच्या सभासदांच्या नावावर सात-बारा उतारा देताना मनस्वी आनंद होत आहे,'' असे उद्‌गार निवारा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी काढले. 

निवारा सोसायटीतील 273 सभासदांच्या नावावर सात-बारा करून त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर सोसायटीचे अध्यक्ष सुरेंद्र व्यास, सुरेश भडकवाडे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, अरविंद पटेल, मधुकर पवार, नगरसेवक जनार्दन कदम, दीपा गिरमे यांच्यासह सभासद उपस्थित होते. 

कोयटे म्हणाले, ""शिवाजी रस्ता येथील अत्यंत छोट्या जागेत किराणा व्यवसाय करत असताना, तालुक्‍यातील सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटमध्ये बसेल असे स्वतःचे वन रूम किचन बाथरूमसह असावे, असे स्वप्न 1982मध्ये पाहिले. विरोधकांनी केलेला अपप्रचार जिव्हारी लागला. त्यानंतर आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. जे द्यायचे ते चांगलेच, हा ध्यास घेतला.''

नगरसेवक जनार्दन कदम यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन करून संदीप कोयटे यांनी आभार मानले.अहमदनगर 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omprakash Koyte gave seven or twelve excerpts