Ahmednagar News : मागणी होताच ७२ तासांतच टॅंकर - राधाकृष्ण विखे

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहिती विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
on demand water tanker within 72 hours radhakrishna vikhe patil ahmednagar
on demand water tanker within 72 hours radhakrishna vikhe patil ahmednagarSakal

अहमदनगर : ‘‘सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. काही गावांत पाणीटंचाई आहे. कोणीही टॅंकरची मागणी केल्यास ७२ तासांत टॅंकर सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, तसेच जिल्ह्यातील साकळाई, ताजनापूरसारख्या महत्त्वाच्या योजनांचे काम प्रगतिपथावर आहेत,’’ अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहिती विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखिल वारे आदी उपस्थित होते.

गोदावरी खोऱ्यात पाण्याचा वाद सुरू आहे. पश्चिमेचे पाणी बोगद्याद्वारे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीगोंदे, नगर तालुक्याला वरदान ठरणारी साकळाई ही महत्त्वाच्या पाणी योजनेचे काम प्रगतिपथावर आहे, तसेच इतर योजनांचेही काम सुरू आहे. जिल्ह्यातील रोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात हे सर्व प्रश्न सुटणार आहेत.

एका प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, की प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्याच्या कॉंग्रेसच्या घोषणेला अर्थ नाही. कॉंग्रेसला जनतेने नाकारले आहे. त्यांच्यात विश्वासार्हता नाही. आपण केलेली कामे लोकांना सांगितली पाहिजेत. प्रसिद्धीच्या मागे न लागता कामे करीत राहिले पाहिजे.

नगर जिल्ह्यातून दहा हजार सूचना

भाजपचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागररिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले आहे. संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा आहे.

भाजपच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सूचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देऊन, संपूर्ण देशातून १६ लाख सूचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही दहा हजार सूचना संकल्‍पपत्रासाठी पाठविण्‍यात आल्या आहेत.

  • शेवगावच्या कार्यकर्त्यांच्या राजीनाम्‍याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यांचे गैरसमज लवकरच दूर होतील.

  • पतसंस्थांच्या संचालकांनी गैरव्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यकच आहे. सहकारामध्ये संचालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

  • शेअर मार्केटमध्ये फसवणूक होत असेल, तर सेबी सारख्या संस्थांनी कारवाई करायला हवी. पोलिसांनी अशा गुन्ह्यांना पाठीशी घालता कामा नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com