
अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात नवे एक हजार २७३ रुग्ण
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये गुरूवारी (ता.२७) दिवसभरात एक हजार २७३ नवीन रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर शहरात सर्वाधिक ५६२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९१२, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २१० आणि अँटीजेन चाचणीत १५१ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख ७८ हजार ७६४ झाली आहे. सध्या ११ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सात हजार १७८ झाली आहे.
हेही वाचा: लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारी संतापजनक; दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी
पारनेर तालुका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तेथे तालुक्यात १०० रुग्ण आढळून आले आहेत. नगर तालुका अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नगर तालुक्यात ७० रुग्ण आढळून आले. संगमनेर ६९, श्रीरामपूर ५५, अकोले ५३, श्रीगोंदे ४०, राहुरी ३०, कोपरगाव १९, पाथर्डी ३३, शेवगाव १५, जामखेड ४३, नेवासे १०, लष्करी रुग्णालय ११, कर्जत ५०, भिंगार छावणी परिषद ५२, बाहेरील जिल्ह्यातील २६ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या एक हजार २५५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख ६० हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१५ टक्के झाले आहे.
Web Title: One Thousand 273 New Corona Patients Per Day In Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..