कोरोना रूग्ण ः नगरमध्ये रोज हजार, आकडा ऐकूनच बेजार

One thousand daily in Corona patient Ahmednagar
One thousand daily in Corona patient Ahmednagar

नगर : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे सांगितले जात असले तरी आकडेवारी भयानक आहे. बघता बघता बाधितांचा दररोजचा आकडा हजारापर्यंत गेला आहे. काही राजकीय पक्ष लॉकडाउनची मागणी करीत आहेत. तर सत्ताधारी अजून ही मागणी गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही स्थानिक पातळीवर हा विषय ढकलून अंग काढून घेतले आहे.
जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५०८१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १८५, संगमनेर ०३, राहाता ०१, पाथर्डी ०२, श्रीरामपूर १४, नेवासा २३, श्रीगोंदा ०४, पारनेर ०६, अकोले १५, राहुरी ०८,  कोपरगाव ०७, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल २१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११३, संगमनेर ०८, राहाता ५०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १७, श्रीरामपुर ४८, नेवासा १०, श्रीगोंदा ०८, पारनेर १४, अकोले ०९, राहुरी २३, शेवगाव ०१, कोपरगाव १६, जामखेड ०२ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९९ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा १९, संगमनेर २१, राहाता २०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर १८,  कॅंटोन्मेंट ०४, श्रीगोंदा २२, पारनेर १०, अकोले १६, राहुरी ४१, शेवगाव ३८, कोपरगाव १३, जामखेड २६ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा  ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या: २९०८५

उपचार सुरू असलेले रूग्ण:५०८१

मृत्यू:५४९

एकूण रूग्ण संख्या:३४७१५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com