esakal | अकोले तालुक्यात ७६ आदिवासी गावात एक गाव एक गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival

अकोले तालुक्यात ७६ आदिवासी गावात एक गाव एक गणपती

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या ७६ गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आले. पंधरा हजार लोकवस्तीच्या राजूर गावात दोन वर्षापूर्वी २५ गतवर्षी १९ सार्वजनिक गणपती होते. मात्र, केवळ चार गणेश मंडळाने गणपती बसविल्याची माहिती राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

राजूरसह चाळीस गाव डांग भाग असलेल्या परिसरात कोरोना पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावात एक गणपती बसवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. या वर्षी गणेश मंडळांनी गावात स्वच्छता व वृक्षारोपण करण्याचा संकलप केला. त्यासाठी नियोजन करण्यात आले. राजूर पोलिस स्टेशनने एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन केल्यावर स्थानिक ग्रामस्थ व गणपती मंडळांनी प्रतिसाद देत एक गाव एक गणपती बसवून सहकार्य केल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आभार मानले.

हेही वाचा: डिंभे, वडज, चिलवडी धरणे ओव्हर फ्लो!

loading image
go to top