भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या वाहतूकीत बदल, पर्यटकांची होणार झाडाझडती

Changes in traffic to Bhandardara
Changes in traffic to BhandardaraSakal

अकोले (जि. नगर) : स्वातंत्र्यदिनादरम्यान सलग तीन दिवस सुटी असल्याने पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रस्ते अरुंद असून, वाहतुकीची कोंडी होऊन कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तीन दिवस परिसरात एकेरी वाहतूक करण्यात आल्याची माहिती राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. सध्या तुरळक श्रावणसरी बरसत आहेत. मुळा-प्रवरा पाणलोटात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने, पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. त्यातच शनिवार ते सोमवारदरम्यान सलग सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. या काळात एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनादरम्यान भंडारदऱ्यात राज्यभरातून पर्यटक येतात. त्यावेळी धरण परिसरात दारू पिऊन धांगडधिंगा घालणाऱ्यांमुळे इतरांना मोठा त्रास सहन करावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Changes in traffic to Bhandardara
पदवी प्रमाणपत्रासाठी मागितली लाच; प्राचार्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दर वर्षी १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तासह वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात येतो. राजूरपासून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी आजपासून रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे, तर भंडारदऱ्याला जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश करता येईल. वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिचोंडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण, स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा असा मार्ग असेल. एकेरी वाहतुकीतून ॲम्ब्युलन्स, अग्निशामक दल, शासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.

Changes in traffic to Bhandardara
नाशिक विमानतळ येणार हज टर्मिनलच्या यादीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com