
कांदाबाजार पुन्हा दोनशे रुपयांनी रिव्हर्स
नगर : सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. चाळीतील कांद्याला पावसाचे पाणी लागून खराब होऊ नये म्हणून शेतकरी वर्ग सध्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत आहे. गेल्या आठवड्यात दोन हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल विकला गेलेला कांदा आज (सोमवारी) बाजार खुला झाल्यावर दोनशे रुपयांनी खाली आला.
आज बाजारात ५९ हजार १३९ कांदागोण्यांची ( ३२ हजार ५२७ क्विंटल) आवक झाली. त्यात एक नंबर कांदा प्रतिक्विंटल एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपये, दोन नंबर कांदा एक हजार पन्नासपासून दीड हजार रुपये, तीन नंबर कांदा पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार पन्नास रुपयांपर्यंत विकला गेला.
हॉटेल व्यवसायाचा प्रभावी परिणाम
पावसाळा असल्याने परराज्यांतील कांदा खरेदी करणारे ग्राहक बाजारात कमी प्रमाणात कांदा खरेदी करतात. लॉकडाउनमुळे हॉटेल व्यावसायिकांचीही कांद्याला मागणी नसल्याने, पावसामुळे आवक वाढली आहे. ग्राहक खरेदीदार सध्या कमी असल्याने कांद्याचे बाजार कमी-जास्त होत आहेत.
- संतोष म्हस्के, उपसभापती, नगर बाजार समिती
हेही वाचा: नगर तालुक्यात दक्षता पथकांची ३४ गावांत कारवाई
हेही वाचा: नाशिक : खासगी लॅबचालकांना डेंगीचा अहवाल कळविणे बंधनकारक
Web Title: Onion Prices Fell By Rs 200 In The Market Ahmednagar News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..