नगरच्या बाजारात पुन्हा कांद्याचा वांदा

लॉकडाउनमुळे भाव गडगडले
Onion prices fell in Ahmednagar market
Onion prices fell in Ahmednagar marketOnion prices fell in Ahmednagar market

नगर तालुका : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक हॉटेले, खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद करण्यात आले आहेत. परिणामी, कांद्याला मागणी घटल्याने भावात घट झाली आहे.

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतही कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. "लॉकडाउन' व कडक निर्बंधांमुळे कांद्याचे भाव कोसळले. गुरुवारी नगरच्या बाजारात 54 हजार 412 कांदागोण्यांची (29 हजार 943 क्विंटल) आवक झाली. 400 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

कांद्याला मिळालेला भाव

क्रमांक एक - 750 ते 1000

क्रमांक दोन - 650 ते 550

क्रमांक तीन - 400 ते 650

क्रमांक चार - 250 ते 400

साठवणूक करा

ज्या शेतकऱ्यांचा कांदा जास्त दिवस टिकू शकतो, त्यांनी त्याची साठवणूक करावी. बाजारात आणण्याची घाई करू नये. टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा. चाळीत कांदा भरताना तिचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुक करून घ्यावे.

- अभय भिसे, सचिव, नगर बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com