
सध्या तालुक्यात मुबलक पाणी आहे. मात्र पोषक हवामान नसल्याने अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
नगर तालुका ः सर्वत्र चांगला फाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा, गावरान कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
पिके जोमात येण्याची आणी वांरवार हवामानात बदल होण्याची एकच वेळ झाल्याने तालुक्यातील पिकांना विविध रोगांना बळी पडावे लागले. रोगाने बाधीत झालेल्या पिकांची वाढ खुंटल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या तालुक्यात मुबलक पाणी आहे. मात्र पोषक हवामान नसल्याने अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
नोहेंबर - डिसेंबर महिन्यातील चांगल्या थंडीची साथ या पिकांना मिळत असते, मात्र या दोन महि÷यात थंडीच गायब झाल्याने वातावरण कधी ढगाळ, तर कधी धुके यामुळे गव्हावर तांबोरा, मावा, ज्वारीवर चिकटा व खोडआळी तर कांद्यावर करपा रोगाचा मोठ्या क्रमाणात फटका बसला आहे. यामुळे खरीपाप्रमाणेच रब्बीच्या हंगामातही शेतकऱ्यांची मशागत, बियाणे, औषधे याचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहमदनगर