

Major Financial Fraud in Nagar: Onion Trader Loses Rs 82 Lakh
Sakal
नगर तालुका : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा व्यापाऱ्याची आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याने ८१ लाख ६७ हजार २४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ३० नोव्हेंबर २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.