

The suspects were produced before the Nevasa court,
Sakal
सोनई : शनिशिंगणापूर येथील बहुचर्चित ऑनलाइन पूजा अॅप घोटाळा प्रकरणी शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील लिपिक संजय तुळशीराम पवार (रा. सोनई) व ‘सीसीटीव्ही’ विभाग प्रमुख सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) या दोघास अहिल्यानगर येथील सायबर क्राईमने गुरुवारी (ता. ४) रात्री अटक केली. आरोपीस नेवासे न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (ता.८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.