साईमंदिराचे चारही दरवाजे खुले करा | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिगंबर हरिभाऊ कोते; शिर्डीत तीन दिवसांपासून आरटीआय कार्यकर्त्यांचे उपोषण

अहमदनगर : साईमंदिराचे चारही दरवाजे खुले करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : साईसंस्थानने प्रसादालय सुरू करावे व द्वारकामाई मंदिराचा मुख्य दरवाजा खुला करावा, चारही दरवाजांतून भाविकांना येण्या-जाण्याची व्यवस्था करावी, यासह विविध मागण्यांसाठी, माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते हे मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. आपल्या मागण्यांना शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी वगळता साईसंस्थानचा एकही अधिकारी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आला नाही, अशी कैफियत त्यांनी आज पत्रकारांसमोर मांडली.

ते म्हणाले, की द्वारकामाई मंदिराचा मुख्य दरवाजा बंद आहे. त्यामुळे ज्या भाविकांना साईसमाधी मंदिरात न जाता सहजपणे द्वारकामाईचे दर्शन घेता येत होते, ते आता बंद झाले आहे. हा दरवाजा उघडला, तर दर्शनार्थी भाविकांची गर्दी विभागली जाईल, तसेच नित्य दर्शन घेणाऱ्या ग्रामस्थांची सोय होईल. दोनशे खोल्यांच्या धर्मशाळेसमोरील उद्यान गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे मुलांना खेळायला जागा राहिली नाही. ग्रामस्थांचा सायंकाळचा विरंगुळा बंद झाला आहे.

हेही वाचा: राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान?

साईमंदिराच्या चारही दरवाजांतून भाविकांना आत व बाहेर येण्या-जाण्याची सुविधा असावी. त्यामुळे गर्दी विभागली जाईल. सध्या भाविक तीन क्रमांकाच्या दरवाजासमोर चपला काढतात आणि पाच क्रमांकाच्या दरवाजाने बाहेर पडतात. त्यांना चप्पल शोधणे मुश्कील होते. साईसंस्थानने ठिकठिकाणी केलेली बॅरिकेडिंग हटवावे. या सर्व बाबी साईसंस्थान प्रशासनाने लक्षात घेऊन त्यावर कृती करावी.

प्रसादालय बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते आहे. त्यांच्यावर खासगी उपाहारगृहात महागडे भोजन घेण्याची वेळ येतेय. त्यांची लुटमार सुरू आहे.

- दिगंबर हरिभाऊ कोते, माहिती अधिकारातील कार्यकर्ते

loading image
go to top