esakal | संगमनेर बाजार समितीत भुसार मालाचा खुल्या पद्धतीने लिलाव 
sakal

बोलून बातमी शोधा

Open auction of Bhusar goods at Sangamner Bazar Samiti

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारपासून (ता. 23) भुसार (धान्य) शेतीमालाचा "विनाअडत, विनाखर्च' तत्त्वावर खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्यात आला असून, आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी हे लिलाव होतील.

संगमनेर बाजार समितीत भुसार मालाचा खुल्या पद्धतीने लिलाव 

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारपासून (ता. 23) भुसार (धान्य) शेतीमालाचा "विनाअडत, विनाखर्च' तत्त्वावर खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्यात आला असून, आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी हे लिलाव होतील. 

लिलावात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट रोख, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे तत्काळ शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच, शेतमालाचे योग्य व अचूक मोजमाप, कोणताही छुपा खर्च नाही. शेतकऱ्यांना फक्त हमाली व तोलाईसाठी होणारी रक्कम अदा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्ह्यात सर्वप्रथम "लूज' शेतमालाची आवक बाजार समितीत सुरू केली असून, यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल जवळजवळ 100 रुपयांप्रमाणे रिकामे पोते व पोते भरण्याचा खर्च वाचणार आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे "लूज' व "पोते' अशा दोन्ही प्रकारे शेतमाल आवकेचा पर्याय बाजार समितीने सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला. एकाच वाहनात "लूज' किंवा त्यापेक्षा जास्त शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारापासून किमान पाच किलोमीटरपर्यंत विनामूल्य पोच करण्याची जबाबदारी शेतकरी किंवा वाहनधारकांची राहील, असे बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी भुसार शेतमाल योग्य प्रतवारी करून बाजार समितीत मोकळा किंवा 50 किलोच्याच गोणीत विक्रीसाठी आणावा. विक्री करताना फसवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यासच शेतमाल विकण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top